Category Archive

Photography

प्रेमाचं मीटर होणार डाऊन कारण “टिक टॅक टो” वेबसिरिज आलेय On ग्राउंड….

अभिनेता तेजस बर्वे ची “टिक टॅक टो” मराठी वेबसिरीज आली प्रेक्षकांच्या भेटीला…

प्रेम आणि युथ जनरेशन या दोघांचे अगदी अतुट असे Connection असते. पण सध्याची युथ जनरेशन स्वत:चं प्रेम व्यक्त करायला किंवा ते समोरच्या व्यक्तीला सांगायला घाबरते. अशाच प्रेमाच्या वेगवेगळ्या फंड्यांवर आधारित कॅफेमराठी प्रस्तूत “टिक टॅक टो” ही मराठी वेबसिरिज तुमच्या भेटीला आली आहे. प्रविण काळोखे हे या वेबसिरिजचे दिग्दर्शक आहेत. ह्या सिरीजचे निर्माते रोहित पाटील आणि अर्चना पाटील असून या सिरीजची प्रस्तुती कॅफेमराठीचे फाउंडर निखील रायबोले आणि भूपेंद्रकुमार नंदन यांनी केली आहे.

सायन्स आणि लॉजिक याचा युथ जनरेशनवर जरा जास्तच प्रभाव जाणवतो. पण याच सायन्स आणि लॉजिकचा प्रभाव प्रेमावर देखील असतो हेच या वेबसिरिज मध्ये पहायला मिळेल. एखाद्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची जाणीव करुन देण्यासाठी सायन्सचे वेगवेगळे फंडे आणि यांचा वापर कसा करावा हे या सिरिज मध्ये तुम्हाला पहायला मिळेल. सागर हा शिरिन वर खुप प्रेम करतो पण तो तिला सांगायला घाबरतो. सागरचं प्रेम त्याला मिळावं म्हणून त्याचे मित्र त्याचे लव्हगुरु म्हणून त्याची साथ देतात. फ्रेंड झोन मधून बॉयफ्रेंड झोन मध्ये जाण्यासाठी सागर अनेक फंडे वापरतो. मित्र, प्रेम आणि त्यांचे प्रेमाबद्दल असणारे वेगवेगळे लॉजिक सांगणारी अशी ही “टिक टॅक टो” वेबसिरिज.

मिसेस मुख्यमंत्री या झी मराठीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस आलेला तेजस बर्वे या सिरीज बद्द्ल सांगताना म्हणतो कि, “सध्याची युथ जनरेशन हि प्रेमाकडे एक निव्वळ टाईमपास म्हणून पाहते. परंतु प्रेम हे टाईमपास नसून त्यात अनेक लॉजिक आणि सायन्सचे अनोखे फंडे लपलेले आहेत ह्याचाच समज तुम्हाला “टिक टॅक टो” हि सिरीज पाहिल्यावर होईल.” असे तो म्हणाला.

तसेच “टिक टॅक टो” या मराठी वेब सिरीज चे निर्माते रोहित पाटील आणि अर्चना पाटील हे देखील सिरीज बद्दल सांगताना म्हणतात कि, “सायन्स हे फक्त पुस्तकी ज्ञान नसून ते खऱ्या आयुष्यात हि महत्वाचे आहे. त्यातले लॉजिक आणि फंडे हे युथ जनरेशन साठी समजून घेणे महत्वाचे आहेत.” हेच सांगणारी हि सिरीज असल्याचे ते सांगत होते.

त्याच प्रमाणे कॅफेमराठीचे संस्थापक निखील रायबोले या सिरीज बद्दल सांगताना म्हणतात कि, “कॅफेमराठीने या आधी हि अनेक वेगवेगळ्या युथ रिलेटेड वेबसिरीजची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. परंतु “टिक टॅक टो” हि वेबसिरीज प्रेम, कॉलेज लाईफ, मित्र आणि त्यात येणारे चढ उतार, प्रोब्लेम आणि सोल्युशन या सर्वांचं एक Complete Package आहे. कॉलेज लाईफ मध्ये प्रत्येक शिक्षण हे पुस्तकात वाचून मिळत नाही तर काही कॉलेजच्या कट्टयावर बसून हि मिळते हे या “टिक टॅक टो” वेबसिरिज मध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.” असे त्यांचे म्हणणे होते.

या वेबसिरिज मध्ये तेजस बर्वे आणि मयुरी कापडणे हे मुख्य भूमिकेत असून आदिश वैद्य, चिन्मय उद्गीरकर, निशीगंधा वाड, आनंद इंगळे, सौरभ गोगाटे, जयती भाटिया, अक्षता सामंत, चंद्रकांत कुलकर्णी हे कलाकार देखील या सिरिज मध्ये आहेत. “टिक टॅक टो” ही वेबसिरिज MX Player, Vodafone Play म्हणजेच VI Movies आणि Airtel Xtream या डिजिटल प्लेटफॉर्म वर प्रेक्षकांना मोफत पहायला मिळेल.